पावनखिंड आणि खरा बाज़ी !

घोडखिंडीतील तो इतिहास नेमका कुणाचा.?हिरडस मावळ खोऱ्याचा एक भाग असलेल्या रोहिड खोऱ्यातील त्रेपन गावाच्या देशमुखीतील एक छोटस गाव म्हणजे ‘शिंद’. या गावातील वैज्यप्रभू यांनी बिदरच्या मिर्झा अलिबेरीद शहाकडून 53 गावचं वतन मिळवून हे घराणे ‘देशपांडे’ झालेलं. वैज्यप्रभू यांचे पुत्र पिलाजीप्रभू, त्यांचा पुत्र कृष्णाजीप्रभू आणि त्यांचा पुत्र बाजीप्रभूपण या रोहिड खोऱ्यातील त्रेपन गावाचे देशमुख होते ,ते बाजी बांदल देशमुख. अन् त्यांचे या त्रेपन्न गावातील गाव होते ते महूड. या देशमुखांच्या त्रेपन्न गावचा कारभार शिंद गावातून देशपांडे पहायचे.

म्हणजे हे देशपांडे बांदल देशमुखांचे कारभारी होते.! देशमुखीतले बाजी बांदल देशमुख आणि कारभारी बाजीप्रभू देशपांडे हे जवळपास समवयीन असेच होते.सिद्धी जोहर याचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्यावर बहुतेक बांदल देशमुखांना सोबत ठेवल्याचा इतिहास आहे. कारण हिरडस मावळ खोऱ्यातील वाटा, पायवाटा, चोरवाटा यांची सर्व माहिती या लोकांना होत्या. त्यामुळे बिकट प्रसंगी हे लोक फायद्याचे ठरतील म्हणून राजांनी हा निर्णय घेतला होता. महाराज गडावरून निसटले तेव्हा बांदलाची ही फौज सोबत घेऊनच.घोडखिंडीत उभे राहून त्रेपन्न गावचे कारभारी बाजीप्रभू देशपांडे लढल्याचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो.! 

पण या त्रेपन्न गावचे मालक असलेले बाजी बांदल देशमुख हे याचं खिंडीत शहीद झाले.! 

मग त्यांच्या खिंडीतील पराक्रमाचा बोटभर का होईना इतिहास का वाचायला मिळत नसेल, याचे दुःख वाटल्याखेरीज राहात नाही.! की नेमके कोणाला फ्लॅश करण्यासाठी मुद्दामच कोणी इतिहासकारांनी तो लपवला असावा ,अशी शंका मनात येते.?विजापूरकडून सिद्धी जोहर आणि औरंगजेबाकडून शाहिस्तेखान ही एकाच वेळी स्वराज्यावर झालेली दोन्ही आक्रमणे शिताफीने परतावल्यानंतर शिवाजी राजांनी रायगडावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमात शिवाजी महाराजांनी खिंडीतल्या पराक्रमाबद्दल बांदल देशमुखांचा मानाची तलवार देऊन सत्कार केल्याचा इतिहास आहे.! मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर खिंडीतला पराक्रम जर बाजीप्रभू देशपांडे यांचा होता तर महाराजांनी देशपांडे घराण्याचा मानाची तलवार देऊन सत्कार करायचा सोडून तो बांदल देशमुख घराण्याचा का केला ??

★ बांदल सेना ★

●2) “भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ॥

मज्जैत्र यत्राः कुवर्णाः प्रोल्लो सन्ति पदे पदे ॥”

अर्थ- “हिरडस मावळामधे लोकप्रिय असणारे राजेबांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत,प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवीत आहेत.”बांदलांच वरिल वर्णन दस्तुरखुद्द शंभुछत्रपतींनी केलंय…● “जैसे अंगद हनुमंत श्रीरामाला तैसे ‘जेधे’ ‘बांदल’ शिवाजीला”असं बांदलांचं वर्णन जेधे शकावलीत आलेलं आहे…या नावाचा संधी विग्रह बाण+दल= बांदल असा केला जातो.. म्हणजे तिरकामठ्याने(धनुष्यबाण) लढणारी सेना.- कृष्णाजी बांदल हिरडस मावळाचे म्हणजे आळंद ते उंबर्डे या क्षेत्राचे स्वतंत्र वतनदार..

– सन 1625 मधे बांदलांनी निजामाचा वजिर मलिक अंबरास हरवुन केंजळगड जिंकला.- 1636 मधे दादोजी कोंडदेव(आदिलशाही,विजापुर सल्तनत) याने कृष्णाजीं बांदल यांजवर हल्ला केला व पराभुत झाला…- पराभवानंतर दादोजीने कृष्णाजींना मसलतीस बोलावुन कपटाने कैद केले व खुन केला..- कृष्णाजींच्या मृत्युनंतर पत्नी दिपाऊ व पुत्र बाजी बांदल आपल्या बांदल सेनेसमावेत स्वराज्यास सामिल झाले..

– बांदल सेनेने स्वराज्यासाठी पुढील लढायांत योगदान दिल्याचे संदर्भ मिळतात… प्रतापगड युद्ध ( अफजलखान प्रकरण, पन्हाळगड वेढा ( सिद्दी जौहर प्रकरण)

   ▶ दक्षिण दिग्विजय मोहीम-पैकी प्रतापगड युद्धात कान्होजीराव जेध्यांसमावेत बांदल सेनेने महत्पराक्रम गाजविला यानंतर शिवरायांनी रुस्तम-ए-जम्याला हरवुन राजापुर व विशाळगड हस्तगत केला विशाळगडाच्या संरक्षणासाठी महाराजांनी बांदल सेनेला तैनात केले..

– तसंच पन्हाळगडच्या पायथ्याला पडलेल्या सिद्धीच्या फौजेला गुंगारा देऊन विशाळगडाकडे जाताना वाटेत गजापुरच्या खिंडीत अवघ्या तिनशे बांदल मावळ्यांनी सिद्दी मसुदच्या फौजेला रोखुन धरुन लढता लढता विरमरण पत्करले…

– यानंतर छत्रपतींनी राजगडदरबारी तलवारीच्या पहिल्या पानाचा मान रायजी नाईक बांदल यांना बहाल केला.- बांदल हे जन्मजात योद्धे होत, बांदलांच्या सेनेनं गजापुरच्या खिंडीत गाजवलेला पराक्रम अद्वितीयच आहे पण आम्ही कथा कादंबर्या वाचुन खिंड फक्त बाजीप्रभुंनीच लढवली असा समज करुन बसलो आहोत. पण याच लढाईत शंभुसिंह जाधव आणि तिनशे बांदलदेखिल प्राणपणानं लढले होते,ज्या प्रमाणात बाजीप्रभुंचा उल्लेख होतो त्या प्रमाणात आजही बांदल सेनेचा किंवा शंभुसिंह जाधवरावांचा साधा उल्लेख होत नाही ही मोठी खंतच…

– दक्षिण दिग्विजय मोहीमेत रायजी नाईक बांदल छत्रपतिंसमावेत होते,मोगली सेनेने शिरुर-शिक्रापुर येथे केलेल्या लुटीमुळे रायजींनी विडा उचलुन मोगली फौजेवर हल्ला केला..- या शिक्रापुरच्या घनघोर रणसंग्रामात रायजी विरगतीला प्राप्त झाले…

– रायजीचे पुत्र सुभानजी यांना छत्रपतींनी मानाची तलवार बहाल केली.. तर अशी बांदल या नावाची ज्ञात गाथा ” एका विशिष्ट वर्गाच्या योद्ध्यांचीच दखल आजवरच्या ‘पक्षपाती’ इतिहासकारांनी घेतली आहे त्यामुळे बांदल सेनेचा पराक्रम आजवर अंधारातच आहे…

पण खरा इतिहास हा ढगांनी झाकोळलेल्या सुर्यासम असतो जास्त काळ लपुन राहत नाही…”

छत्रपतिंशी एकनिष्ठ असणार्या बांदल देशमुख घराण्यातील विरांच्या समाध्या पिसावरे ता.भोर,पुणे या गावी असुन इतिहासप्रेमींनी थोडी वाट वाकडी करुन आवर्जुन भेट देण्यासारख्याच आहेत…

– या शुर परंतु अपरिचीत योद्ध्यांना वंदन

 बांदलांनी शंभुराजांच्या काळातदेखील स्वराज्याशी इमान ठेवले होते

संदर्भ-

1- स्वराज्याचे शुर सेनानी:दामोदर मगदुम

2- जेधे शकावली:अ.रा.कुलकर्णी

3- शिवभारत:संपादक स.म.दिवेकर

4- बांदल तकरीर:संपादक ग.ह.खरे,ना.के.जोशी

3) बाजी प्रभू हे इतिहासा मध्ये

पावनखिंडीतच प्रकटले 

हे प्रकरण संशयास्पद आहे!

पावनखिंडीत शुंभूसिंह जाधवराव आणि३०० बांदलांनी जीवाची परवा न करता हि खिंड लढवली.जेधे यांच्या कडे मानाच पान होत ते बाजी बांदलांना शिवरायांनी दिल.

बाजी बांदल आणि फुलाजी बांदल यांनी खिंड लढवली बाजी प्रभू देशपांडेंनी नव्हे”

“शंभूसिंह जाधवराव ,बाजी बांदल आणि त्यांचे बंधू फुलाजी बांदल यांना मानाचा मुजरा”

Advertisements

सत्यवानाची कोणती सावित्री पाहिजे ? सबला की अबला ?


लहानपनी पासुन आपण सत्यवान सावित्रीची ती रंजक कथा ऎकतोय, आज ही काही जरी झाले, नव-याने रोज दारु पिऊन मारले, काही ही केले तरी हाच नवरा मिळावा म्हणुन आजच्या अबला माता भगिनी दरवर्षी न चुकता त्याच दारुड्या नव-याचे स्वत:ला मारण्यासाथी त्रास देण्यासाठी आयुष्य वाढु दे म्हणत त्याच्या सोबत ७ जन्म मिळू देत म्हणुन आज वटपौर्णिमा उपाशी राहुन आनंदात साज-या करतात. 

मित्रानो आज जी कथा सांगितली जाते तिच थोडक्यात जरा समिक्षण करु आपण, सावित्रीची कथा अवलोकताना मनात अनेक प्रश्न उदभवतात, आपल्याला सांगितले जाते की सावित्रीने सत्यवान गतप्राण होतात यम आला आणी तो सत्यवानाचे प्राण नेताना ती त्याच्या मागे लागली. 

पहिली गोष्ट अशी की, 

 • सावित्रीला यम दिसला कसा
 • सावित्रीच्या काळात एखाद्या पतीचा जिव नेताना काय प्रत्येक स्त्रीला दिसायचा ? 
 • मग सावित्रीलाच कसा दिसला
 • सावित्री काय उच्चकोटीची संत होती का की जिला देवतांचे दर्शन व्हायचे ? 
 • मग ती त्याच्या मागे लागलीच कशी? 
 • तिने शेवटपर्यंत पाठलाग केला आणी त्या फ़कत पाठलागामुळे यम प्रसन्न झाला ? 
 • वर माग म्हणुन सांगितले, आणी सावित्रीने वर ही मागितले ते अनेकवेळा. मग यमाकडून काय मान्सुन सेल होता का वरांच्या सवलतींचा ? 
 • बर त्या सावित्रीने प्राण यमाकडून परत आणले मग त्या नंतर एका ही स्त्रीला सदर यमराज का दिसला नाही ? 
 • एकीने ही प्राण आणले नाहित परत ? याची उत्तर कोणी दिली तरी स्वागतच आहे, असो या भाकड कथेमध्ये जास्त न रमता आपण सत्यवान सावित्रीच आधुनिक पध्दतीने जमेल तस विश्लेषण करु, 

खर तर असल्या भाकड कथा करुन आपण सावित्रीच्या गुणाना झाकण्याचा तर प्रयत्न करत नाही ना ?

 •   सावित्री ही एक ज्ञानसंपन्न स्त्री होती आणी तिला वैद्यकशास्त्र ही आवगत होते आणी तिने स्वत:हुन सत्यवानाला -हदयविकाराचा त्रास आहे हे माहिती असुन ही त्याच्याशी विवाह केला होता. 
 • पुढे पावसाळा चालु होणार म्हणुन पावसाळ्याच्या पुर्वाधाला लाकुड फ़ाटा गोळा करण्यासाठी जायच ठरवल. 

जर येण्यास थोडा वेळ जरी झाला तरी दिसव म्हणुन पौर्णिमेचा दिवस सत्यवान व सावित्रीने ठरवला असावा, दिवस भर लाकड तोडत तोडत केलेल्या श्रमामुळे सत्यवानाला भॊवळ आली, तो झाडावरुन कोसळला, त्याचा श्वास मंदावला, त्याची ती -हदयविकाराची लक्षण सावित्रीने बरोबर ओळखली, वैद्यक शास्त्राचे ज्ञान असल्यामुळे तिने आजुबाजुला शॊध घेतला, आजच्या आधुनिक काळात जसा औक्सिजन लावला जातो तसा आता सत्यवानाला औक्सिजनची गरज आहे आणी या जंगलात पुष्कळ प्रमाणात औक्सिजन देणारा वृक्ष म्हणजे वडाचे झाड !! हे तिच्या चाणाक्ष बुध्दीने हेरल आणी तिने सत्यवानाला ओढत वडाच्या झाडाखाली नेले, पौर्णिमेच्या चांदण्यात तिने पंपींग करुन वा अन्य उपचार सत्यवानावर केले, कालांतराने सत्यवानाचा श्वास रेग्युलर झाला, सत्यवान पुर्वपदावर आला, सावित्रीने अश्यावेळी तिला उपयोगी पडणा-या वडाच्या झाडाचे व प्रकाश देणा-या चंद्राचे कृतज्ञता भावाने आभार मानले, तोच आजचा दिवस. आता काही लोक म्हणतील की सावित्रीच्यामुळे तिच्या सासु सास-याना दॄष्टी मिळाली अस ही सांगितल जातय त्याच काय ? ज्या व्यक्तीला वैद्कशास्त्राचे इतके ज्ञान आहे ती व्यक्ती नक्किच सासुसास-यांच्या डोळ्यांवर दिर्घ काळ उपचार करत असणार आणी त्या उपचारांचे फ़ळ म्हणुन त्यांची दॄष्टी पुर्ववत झाली असेल म्हणजेच डॉक्‍टर सावित्रीमुळेच सत्यवानाचे प्राण ही परत आले आणी सासुसास-याना दृष्टी ही मिळाली. आज या डॉक्‍टर सावित्रीची आठवण काढण्याचा दिवस, सावित्रीच्या ज्ञानाला नमस्कार करण्याचा दिवस.
मग आता प्रश्न असा पडतॊ की आपल्याला कोणती सावित्री पाहिजे? 

कथांमधील नव-याच्या प्राणाची भिक मागणारी तथाकथीत अबला सावित्री की आपल्या ज्ञानाच्या बळावर नव-याचे प्राण वाचवणारी सबला डॉक्‍टर सावित्री ? 

तुम्हाला निवड करण्याचा पुर्ण अधिकार आहे, मित्रानो तुम्हीच निवडा तुमची निवड….. 

छत्रपति संभाजी महाराज समाधि आणि इतिहास

छ्त्रपति संभाजी महाराज(१६५७-१६८९)

भिमाकोरे गावा पासुन ७की.मी. अंतरावर “वढु” गाव आहे…..येथेच “छ.संभाजी महाराज” यांचा खुन झाला व त्यांचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे “शीर” कलम केले जाईल……
आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही “सरदार,पंत”पुढे आला नाही. पण एका “पहिलवानाला” ही बातमी समजली 

तो धाडस करतो सर्व “तुकडे” जमा करुन स्वत:च्या घरी आणुन “शिंपीला” हातपाय पडुन तैयार करतो 

आपला राजा आहे त्यास असे नाही सोडू शकत…..

तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाच धाडस पाहुन त्याचे “नातलग” ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात….

आणि त्या पहिलवानाच्या अंगणात छत्रपति संभाजी महाराजाना अग्नि डाग स्वत: तो पहिलवान देतो…..

त्या पहिलवानाचे नाव होते 
गणपत महार

”’होय एका महाराने छ.संभाजी राजेंना “अग्नि” दिली. “

आज ही संभाजी राजेंची “समाधी ही “महार वाडयात” आहे….

ही बातमी मोगल व भटांना समजता “गणपत” महार आणि बाकी मंडळीचे “शीर कलम” केले व महार जाती ने दिवसा “बाहेर पडण्यास बंदी घातली…..” 

कमरेला झाडू आणि गळ्यात मडके” टाकले अशी “शिक्षा भटांनी” सुनावली.

पुढे ही बातमी पुणे मध्येही पसरली लोक ह्या “गणपत” ला वंदन करु लागले. 

महाराचा देव झाला म्हणुन “भट” चिडले

इंग्रज भारतात आले, पुण्यामध्ये शिरने हाँ हेतु.

पेशवे  हे होलकर,शिंदे,गायकवाड़ जीवावर मस्तीत आणि इंग्रजाना यांच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता त्याचे नाव “”सिध्दटेक महार”” होते.

तो इंग्रजां सोबत “करार करतो” तुम्हाला हे राज्य मिळुन देतो.
तुम्ही “आमचे मडके झाडू मुक्त” करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार दया. इंग्रज त्याची अट मान्य करतात.

हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील “संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन”” घेताे आणि म्हणतो राजे

आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो शक्ती दया, आशिर्वाद दया” असे म्हणून “५०० महारांनी” या मस्तावलेल्या “२५००० पेशव्यांना” संपऊन टाकले……

तो दिवस होता १जानेवारी म्हणुन हा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो….

आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे

हेच त्यांच्या समस्यांचे एक “प्रमुख कारण” आहे

 🔲बुद्धा नंतर “धम्म”नाही    

अशोका नंतर “सम्राट”नाही। 

🔲तुकोबा नंतर ” जगतगुरु ” नाही ।
जिजाऊ नंतर ‘” संस्कार ” नाही ।
🔲शिवबा नंतर ” छत्रपती ” नाही ।
शंभुराजे नंतर ” आचरण ” नाही 
🔲वाल्ह्या नंतर ” परिवर्तन ” नाही ।
🔲पुंडलिका नंतर ” सेवा ” नाही ।
जोतिबा नंतर ” सत्यशोधक ” नाही 
🔲सावित्री नंतर ” शिक्षण ” नाही ।
जिवाजी नंतर ” रक्षण ” नाही ।
🔲मावळ्या नंतर ” मरण ” नाही ।
🔲बाबासाहेबा नंतर ” संविधान ” नाही
राजश्री शाहू नंतर ” आरक्षण ” नाही ।
🔲आण्णाभाऊ साठे  नंतर ” लोकशाहीर ” नाही ।
गाडगे बाबा नंतर ” लोकजागर ” नाही । 
🔲तुकडोजी महाराज नंतर “ग्रामगीता” नाही।
माणसा हा जन्म पुन्हा नाहि.
अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानले बाबासाहेबांना……
बाबासाहेबांनी गुरु मानले राष्ट्रपिता म.फुलेंना(बुध्द,कबिर)…………
म.फुलेनी गुरु मानले छञपती शिवाजी महाराजांना………..
शिवरायांनी गुरु मानले राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना…………..
तुकरामांनी गुरु मानले तथागत गौतम बुद्धांना…………….
जातीच्या नावावर आज आपण या तमाम महापुरुषांना वाटून घेतले आहे.

सम्राट अाशोकची जात धनगर बाबासाहेबांची जात महार आणि म.फुलें माळी समाजाचे पण बाबासाहेबांनी म.फुलेंना त्यांची जात न पाहता गुरु मानले.

शिवाजी महाराज मराठा होते तरी त्यांनी तुकाराम महाराजांची जात न बघता त्यांना गुरु मानल………

तुकाराम महाराजांचा तथागत गौतम बुद्धांशी काहीच संबध नव्हता तरी त्यांनी बुद्धांना गुरू मानल……

या महापुरुषांच्या राजकारण करणारया राजकारण्यांनी या महापुरुषांना विशिष्ठ धर्माच्या बेडीत अडकवले आहे………
पण एक गोष्ट लक्षात घ्या या महापुरुषांनी आपापसात कधी जातीवाद नाही केला. मग त्यांच्या नावावर जातिवाद करणारे हे मुर्ख राजकारणी कोण…….?

आपल्या मधे धार्मिक तेढ निर्माण करणारया नेत्यांच्या भाषणांना बळी पडू नका..

“पेशवा” – मराठा आणि भारतीय साम्राज्यास लागलेली किड

भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवाकान्होजीं आंग्रेच्या कोकणातील कार्यास सन १६८१ च्या दरम्यान सुरुवात झाली. सन १६९४ ते १७०४ पर्यंत कान्होजींनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून घेतले. छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना ‘सरखेल’ हा किताब दिला व मराठ्यांच्या आरमाराचे मुख्याधिकारी केले. सन १६९६ मध्ये कान्होजींनी कुलाबा किल्ला जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले.

छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर (तारीख २ मार्च १७००) त्यांच्या पत्नी ताराबाईंनी स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेऊन मोगलांविरुध्द आघाडी उघडली. कान्होजींनी सन १७०० ते १७१० मध्ये अनेक विजय मिळविले. औरंगजेबच्या मृत्युनंतर मोगलांनी शाहूंची सुटका केली. शाहूंनी सन १७०७ साली स्वतःस राज्याभिषेक केला. त्या दरम्यान ताराबाई व संभाजीराजेंचे पुत्र शाहू यांच्यामध्ये गादीबद्दल तंटा सुरू झाला. ताराबाईंनी सावंतवाडी ते मुंबईपर्यंतच्या किनाऱ्याच्या संरक्षणार्थ मराठी आरमाराचे प्रमुख म्हणून कान्होजींना नेमले आणि इंग्रजांच्या मदतीने शाहूंनी कोणतीही हालचाल करू नये, या हेतूने राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास कान्होजींना सांगितले. सन १७१३ साली शाहूंनी कान्होजींविरुद्ध बहिरोपंत पिंगळे ह्यास धाडले. कान्होजींनी त्यांचा पराभव करून त्यास कैद केले. त्यामुळे छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ या पेशव्यास कान्होजींवर धाडले. बाळाजीने कान्होजींबरोबर सलोखा करून तह केला. त्यात कान्होजींस कोकणकिनारपट्टीचे सर्व किल्ले मिळाले व त्यांनी छत्रपती शाहूंचे अंकित बनून सालाना १२,००० रु. त्यास देण्याचे ठरले. त्यांची सरखेली कायम ठेवण्यात आली. तसेच मराठी आरमाराचे सर्व आधिपत्य त्यास दिले. अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले (फेब्रुवारी १७१४) व अखेरपर्यंत छत्रपती शाहूंकडे निष्ठेने राहिले.
कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून ते त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट तत्कालीन इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि जंजिऱ्याच्या सिद्दीस बोचत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी कधी स्वतंत्रपणे तर कधी संयुक्तरीत्या कान्होजींवर चढाई केली. पण प्रत्येक वेळी त्या सर्वांचा पराभव झाला. 

आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून जाणाऱ्या जहाजास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निर्विवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले. कान्होजींनी पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर आदी अनेक देवस्थानांना इनाम तसेच देणग्या दिल्या. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी गोद्या बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत. कान्होजी प्रेमळ होते. तथापि त्यांचे हुकूम सक्तीचे व शिक्षा कडक असे. त्यांना मथुराबाई, लक्ष्मीबाई व गहिनाबाई या तीन धर्मपत्‍नी होत्या. त्यांना सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी आणि धोंडजी असे सहा मुलगे झाले. असा हा सागरी अनभिषिक्त राजा अलिबाग येथे तारीख ३ जुलै १७२९ रोजी मरण पावला.

कान्होजीनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी हे सरखेल झाले. ते कान्होजी सारखेच पराक्रमी होते. त्यांनी जंजिरेकर सिद्दीचा चांगलाच बंदोबस्त केला होता. छत्रपती आणि पेशवे या दोघांबरोबर चांगले संबंध ठेवून त्यांनी मराठ्यांच्या आरमाराचा उत्कर्ष केला. दुर्दैवाने त्यांना अल्पायुष्य लाभले. सन १७३३ साली ते मरण पावले. सेखोजी मरण पावल्यावर संभाजी आणि मानाजी यांच्यात सरखेलपदावरून कलह निर्माण झाला. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी दोघा बंधूत मध्यस्थी करून सन १७३५ मध्ये संभाजीस ‘सरखेल’ हा किताब आणि सुवर्णदुर्ग किल्ला तर मानाजीस ‘वजारत-म-आब्’ हा किताब आणि कुलाबा किल्ला दिला. संभाजी सन १७४२ साली मरण पावल्यावर त्यांचे बंधू तुळाजी ‘सरखेल’ झाले (सन १७४२-१७५६).तुळाजी हे आपल्या पित्यासारखेच पराक्रमी होते. त्यांनी सिद्दीच्या प्रदेशावर आक्रमण करून त्याचे गोवळकोट आणि अंजनवेल (गोपाळगड) हे किल्ले जिंकले. त्यांनी इंग्रजांच्या जहाजांना आपले परवाने (दस्तक) घ्यावयास लावले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांचा सर्वत्र दरारा निर्माण झाला. तुळाजींनी इंग्रजांची Charlotte of Madras, William of Bombay, Svern of Bengal and, Darby, Restoration, Pilot, Augusta and Dadabhoi of Surat अशी एकाहुन एक बलाढ्य जहाजे पकडली होती.
एका इंग्रज अधिकाऱ्याने तुळाजींचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, “तुळाजी रंगाने निमगोरे, उंच आणि रूबाबदार होते. त्यांना पाहिल्यावर त्यांच्या मूर्तिमंत शौर्याची कल्पना येते. त्यांची कृतीही त्यांच्या रूपास साजेसी आहे. कोणतेही जहाज त्यांच्या तावडीत सापडले की, ते सहसा सुटून जात नसे. इंग्रज व्यापाऱ्यांनी त्यांचा इतका धसका घेतला होता की, देवापासी ते तुळाजीस पकडून आमच्या ताब्यात आणून दे असा धावा करीत असे.तुळाजींची शक्ती आणि तयारी कायम परिपूर्ण असे. त्यांची बंदरे भरभराठींत असून रयत सुखी आहे. तीस हजार फौज त्यांच्यापाशी असून त्यांची तयारी नेहमी जय्यत असे. त्यांच्या तोफखान्यावर अनेक कुशल युरोपीय लोक, लष्करी आणि आरमारी कामे झटून करीत होते. त्यांच्या आरमारात साठांवर अधिक जहाजे आहेत शिवाय हत्ती, दारूगोळा व शस्त्रास्त्रे असंख्य आहेत.” (संदर्भ : राजवाडे खंड १, २, ३, ६, आंग्रे हकीकत.).
तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. सन १७५६साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. 

या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या ताब्यात आले.त्यांना पेशव्यांनी वंदन किल्ल्यावर कैदेत ठेवले.सुमारे तीस वर्ष ते पेशव्यांच्या कैदेत होते.कैदेतच त्यांचे निधन झाले. ज्यांच्या नावाने फिरंगी घाबरायचे, त्यांना पेशव्यांनी कैदेत ठेवुन काय साधले.? इंग्रज, सिद्दी, पोर्तुगीज, फ्रेंच या परकीय सत्तेविरूध्द लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले आरमार नानासाहेब पेशव्यानी आपल्या कोत्या दृष्टीने बुडविले. आंग्रेंचा पराभव केल्यावर इंग्रजांनी यशवंतगड आणि सिंधुदुर्ग थोड्याच अवधीत आपल्या ताब्यात घेऊन कोकण किनारपट्टीवरचे आपले स्थान बळकट केले. इंग्रजांना सामील होऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार नष्ट करण्याची नानासाहेब पेशव्यांची ही चूक भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घोडचूक म्हणता येईल. कारण यामुळे इंग्रजांना पश्चिम किनारा आपल्या साम्राज्यविस्तारासाठी खुला झाला आणि त्यांचे भारतातील पाय अधिक घट्ट झाले. 

मराठ्यांचे बलाढ्य आरमार नष्ट झाले नसते तर इंग्रजांची सत्ता भारतात कधीच प्रस्थापित झाली नसती. अडमिरल वॅटसनच्या विजयदुर्गावरील विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात शिरकाव झाला त्यामुळे त्याच्या निधनानंतर त्याचे स्मारक ईस्ट इंडिया कंपनीने Westminster abbey (इंग्लंड) या ठिकाणी बांधले आहे.त्याची समाधी कोलकत्ता येथे आहे.(संदर्भ : History of the Konkan By Alexander Kyd Nairne ,पान ९५)

विजयदुर्ग युध्दाची माहिती 

युध्द तारीख : फेब्रुवारी १७५६

युध्दबलाबल
मराठा आरमार 

सेनानी सरखेल तुळाजी आंग्रे

आरमारी सैनिक २०००

तोफा २५०

छोटी मोठी जहाजे २००
इंग्रजी आरमार 

सेनानी अडमिरल वॅटसन ,कर्नल क्लाइव्ह

नेता नानासाहेब पेशवा

आरमारी सैनिक ५०० 

मराठा सैनिक १००० (नानासाहेब पेशव्याचे अंकित) 

मोठी जहाजे २०

दुसरा बाजीराव पेशवा (ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्याच्या विस्तारास कारणीभूत पेशवा)
विठोजी होळकरांच्या ( डिसेंबर १८०१ साली), दुसऱ्या बाजीराव पेशव्याने केलेल्या अमानुष हत्येमुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला करायचा निर्णय केला व पुण्याच्या दिशेने चाल केली. दिनांक ८ ऑक्टोबर १८०२ रोजी पेशव्याच्या फौजेचा बारामतीजवळ त्यांच्या फौजेने पराभव केला. होळकरांचा फौजफाटा पाहून घाबरलेल्या दुसऱ्या बाजीरावाने दिनांक १४ ऑक्टोबर, १८०२ रोजी पुणे येथील तत्कालिन रेसिडेंट कर्नल बॅरी क्लोज याच्याशी बोलणी करण्यासाठी आपला दुत पाठविला.पण बोलणी पुर्ण होण्याअगोदरच परत पुण्याजवळ हडपसर येथे होळकर आणि पेशव्यांच्या सेनेचे २५ ऑक्टोबर, १८०२ रोजी युद्ध झाले ज्यात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीराव २६ ऑक्टोबरला पळून महाडला गेला. व तेथुन सुवर्णदुर्गच्या आश्रयास गेला. तेथून त्याने मुंबईच्या गव्हर्नरशी आश्रयासाठी निरोप पाठविला. डिसेंबरमध्ये होळकरांची तुकडी सुवर्णदुर्गला पोहचली पण तत्पुर्वी तो १७ डिसेंबर १८०२ रोजी ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातून वसईला पोहचला. यशवंतराव होळकरांनी त्यास समजाविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तरीही तो इंग्रजांना जाऊन मिळालाच.कर्नल क्लोजने त्याचे स्वागत करून ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने ३१ डिसेंबर १८०२ रोजी वसईचा तह दुसऱ्या बाजीरावाबरोबर केला. या तहामुळे मराठ्यांच्या हालचालीवर मोठी बंधने आली. इंग्रजाचा भारतातील सर्वात मोठा शत्रू स्वतःहून मांडलिक झाल्यामुळे इतर राजसत्तांनी पण घाबरून हेच धोरण स्विकारले व काही वर्षातच संपुर्ण भारतात इंग्रजाचे साम्राज्य विस्तारले.
  -या तहाद्वारे पेशव्याने सहा बटालियनची (६००० लढवय्ये) फौज स्विकारली. यात कायमस्वरूपी देशी पायदळाचा समावेश होता आणि त्याला युरोपियन तोफखान्याची व इतर शस्त्रास्त्रांची जोड होती. हे सारे सैन्य पेशव्याच्या मुलुखात कायमस्वरूपी राहणार होते.

-या फौजेच्या खर्चासाठी वार्षिक सव्वीस लाख रूपये उत्पन्नाचे जिल्हे कंपनीला तोडून देण्यात आले होते.

-या तहाद्वारे पेशव्याने त्याचे सुरतवरील सर्व अधिकार सोडून दिले.

-कंपनी व बडोद्याचे गायकवाड यांच्यात जे करारमदार झाले त्यांना पेशव्याने मान्यता दिली.

-पेशव्याचे गायकवाड व निजामाशी जे वाद होते ते सर्व मध्यस्थीसाठी कंपनीकडे सोपविले.

इतर सत्तांशी भविष्यात ब्रिटिशांच्या पूर्वपरवानगीशिवाय युद्ध किंवा तह न करण्याचे पेशव्याने मान्य केले.

नानासाहेब पेशव्याच्या घोडचुकीमुळे उदयास आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्याच्या विस्तारास परत एक पेशवाच कारणीभूत ठरला. थोरले बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे सोडले तर इतरांचे कर्तुत्व मराठेशाहीला बुडविण्यास साह्यभुत ठरले.

शिव-पार्वती :-बहुजनांना प्रेरक असे एक महान आद्य दांपत्य…!


शिव-पार्वती :-बहुजनांना प्रेरक असे एक महान आद्य दांपत्य…!

शिव हे व्यक्तीत्व मूळचे आर्यांचे नाहीच हे बहुतेक सर्व संस्कृती अभ्यासकांनी मान्य केले आहे…सिंधुजन संस्कृतीत देखील शिवाचे अस्तित्व होते…!

शिव-पार्वती हे बहुजनांनाचे अतिप्राचीन काळातील अत्यंत गुणसंपन्न असे पूर्वज दांपत्य होय…त्यांच्या आधीचा इतिहास सापडणे अवघड आहे त्यामुळे एका दृष्टीने त्यांना तसे मानता येईल…!

आर्य आल्यानंतरच्या काळात त्यांचे दैवतीकरण करण्यात आले…

शिवाला शंकर,महादेव,ईश,ईशान,रुद्र,भव,भर्व,सांब अशी विविध नावे देण्यात आली… 

पार्वतीला दुर्गा,उमा,चंडी,काली,गौरी इत्यादी नावे प्राप्त झाली…!

शिव हा सदैव “असुरांचा पाठीराखा” होता आणि विष्णू नेहमी असुरांचा नाश करण्याच्या प्रयत्नांत होता असेच आपल्याला आढळते….!

वैदिकांनी नंतरच्या काळात काही ठिकाणी शिवाविषयी आदर व्यक्त केल्याची वर्णने पाहायला मिळतात तरीदेखील त्याच्याविषयी “पुन्हा पुन्हा अनादरही” व्यक्त केलेला दिसून येतोच…!

शंकराचे वर्णन करताना अनेकदा “भोळा सांब” हे शब्द वापरले जातात…शंकराचे एकूण चरित्र पाहता हे भोळेपण भोळसटपणाचे नसून त्याची निष्कपट मनोवृत्ती असल्याचे दिसून येते…!

वैदिक परंपरेने बहुतेकवेळा “शिवापेक्षा विष्णूला श्रेष्ठ” मानले आहे..विष्णूचे खोटे दहा अवतार लोकांच्या मनात जसे रुजवण्यात आले तसे शिवाच्या बाबतीत झाले नाही…!

शिवाला स्मशानात राहणारा,भूतां खेतांचा नेता…राक्षसांचा तारणहार म्हणूनच समोर आणले गेले आहे…यामागे “शिवाची कुचेष्टा” करणे हेच वैदिकांचे धोरण होते…!

वास्तवात शिवाने ज्यांना मदत केल्याची वर्णने आढळतात ते सर्व नाग,असुर,दैत्य,दानव,राक्षस,पिशाच,भूत,खेचर किंकर इत्यादि येथील मूळचे मानवसमूह असल्याचे दिसून येते…याचा अर्थ सरळ आहे…

आर्य आणि अनार्य या लढाईत शंकर नेहमीच “अनार्य” लोकांच्या बाजूने उभा राहत होता…!

शंकराच्या गळ्यात सदैव “नाग” असल्याचे दिसून येते तर विष्णूचे वाहन गरुड आहे याचा प्रतिकात्मक अर्थ लक्षात घेतला तरी समजून येईल “नागांना मारणारा त्यांचे भक्षण करणारा” म्हणून विष्णुसाठी नागांचा शत्रू गरुड हे वाहन निवडले आहे…!

नागाचे स्थान शंकराच्या गळ्यात आहे,हे त्या दोघांमधील एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीक आहे…एखादी व्यक्ती प्रिय असली कि तिचा उल्लेख “गळ्यातील ताईत” म्हणून करतात…!

वासुकी हा नाग शिवभक्त आहे…शेष या नागाच्या हातात “नांगर आणि कोयता” असणे आणि शंकराचे वाहन नंदी असणे यावरून त्या दोघांचाही “कृषीसंस्कृतीशी” असलेला संबंध स्पष्ट होतो…!

अवैदिक गणपती शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख हे सूत्र आपण लक्षात घ्यावे लागेल..गणपती हे केवळ एका व्यक्तीचे वा देवतेचे नाव या दृष्टीने पाहणे यापेक्षा “गणपती” हे एक “अत्यंत महत्वाचे पद” म्हणून पाहणे हा खरा ऐतिहासिक दृष्टिकोन होय…काळाच्या ओघात शंकराचे वैदिकिकरण झाले त्यामुळे गणपतीचेही होणे स्वाभाविक आहे…!

“मूळ क्षेत्रपती” असणाऱ्या आपल्या अनार्य लोकांची आज झालेली सांस्कृतिक दुराव्यस्था कशामुळे झाली ते समजून घ्यावीच लागेल…!

आमच्या रक्तवहिन्यांमधून “असुर दैत्यांचे रक्त” वाहत असेल तर ते आम्ही का नाकारावे…? आपल्या देशात लहानपनापासून मुलांना औपचारिक शिक्षण देताना त्यांची मने आत्मद्वेषाने भरून टाकण्याचा उद्योग केला जातो…आपण आर्य आहोत अनार्य मागास होते म्हणून आपण श्रेष्ठ आहोत असा खोटा अभिमान मनावर बिंबवला जातो…!

आज महाशिवरात्रीला शंकराचे स्मरण करताना स्वतःला प्रश्न विचारू आपण आर्य कि अनार्य…मग सगळेच आर्य आहोत तर अनार्य गेले कुठे…? स्वतःच्या नजरेने स्वतःचा इतिहास पाहूयात…!

सर्वच बहुजन दैवतांचा संदर्भ शंकराशी कसा काय जोडला जातो…जोतिबा,खंडोबा,बिरोबा,भैरोबा,म्हसोबा आदी सर्वच देवांना “सदाशिवाचे रूप” का मानले जातेय याचाही मागोवा घेण्याचा संकल्प करूयात…!

स्वतःला स्वतःच्या महान इतिहासापासून अलग करून टाकण्याच्या “आत्मघातकी” विचारापासून मुक्त होण्याची गरज आहे…ज्या दिवशी आपण आपल्या नजरेने स्वतःकडे पाहू त्यावेळी आपली आपल्याला ओळख पटेल आणि तो दिवस आपल्या “आत्मज्ञानाचा” असेल…!

संदर्भ “बळीवंश” डॉ. आ. ह.साळुंखे.

“अच्छे दिन” – बोधकथा


एक गाढव होते. ते एका मालकाकडे काम करत होते. एकावेळी 5 मीठाची पोती वाहुन नेण्याचे काम त्यास करावे लागत होते, जे त्यास ञासदायक वाटत होते. मीठाची पोती कमी करुन भार हलका करावा असे त्या गाढवाची मागणी होती. ते एकसारखे मालकाकडे मागणी करत होते. पण मालक निष्टूर होता. त्याचे ऐकत नव्हता. बिचारे गाढव ञास सहन करत होते.
ञास असहाय्य झाल्यावर गाढवाने पळ काढायचे ठरवले. एके राञी ते पळून गेले. पण पोटापाण्यासाठी कोणत्यातरी मालकाकडे जायलाच हवे. म्हणून दुसऱ्या गावातील एका मालकाकडे गेले.
नवीन मालकाची भेट घेतली. नवीन मालकाने त्याचे स्वागत केले. पहिले दोन दिवस कोणत्याही प्रकारचे काम न देता काम किती कमी असेल, किती चांगले असेल, ञास कसा होणार नाही या बद्दलच बोलत राहीला. गाढव खूष झाले. त्याला वाटले कमी काम, चांगले रहायला व खायला मग माझे अच्छे दिन येणार. गाढव भविष्यातील अच्छे दिनच्या खूषीत होते. 
मालकाने एके दिवशी सांगितले आपण तुला कामास सूरवात करावयाची आहे. अच्छे दिन हवे असतील तर काही दिवस ञास सहन करावा लागेल, आहेस तयार? गाढव म्हणाले हो आहे तयार. मालकाने हे वाक्य त्याच्याकडून तीन वेळा वदवून घेतले. गाढव कामास खूप उत्साहीत होते व ञास सहन करण्यास तयार होते.
नव्या मालकाने कामास सुरवात केली. गाढवाच्या पाठीवर 3 मीठाची पोती टाकली. गाढव आनंदाने पोती टाकून आले. परत तीन टाकून आले, पण मालकाने खायलाच काय दिले नाही. गाढवाने तक्रार करताच “अच्छे दिन” ची आठवण करुन दिली. गाढव आनंदाने उपाशी झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी 6 पोती गाढवाच्या पाठीवर टाकले, गाढवाने उत्साहाने काम पूर्ण केले. परत 12 पोती टाकले, गाढवास खूप ञास होऊ लागला पण अच्छे दिन च्या अपेक्षेने काम पूर्ण केले. गाढव थकले होते, भुकेजले होते, तहानले होते पण नव्या मालकाने काही दिले नाही. गाढव गोठ्यात झोपण्याच्या तयारीत असताना मालक अचानक प्रकट झाले. 

मालकाने सांगितले तुझे खूप हाल होत आहेत, आगोदरच्या मालकाने तुझ्या ताकदीचे खच्चीकरण केले आहे. ताकद वाढवावी लागेल तरच आच्छे दिन येतील व तु सूखी होशील. 
गाढवाच्या आशा पल्लवीत झाल्या. “अच्छे दिन अच्छे दिन.”

मालक म्हणाला उद्या पासून ञास वाढणार आहे. तयार आहेस? परत गाढवाकडून तीन वेळा वदवून घेतले. गाढव आनंदाने तयार झाले.

गाढवाचे काम सुरू झाले. मालकाने 20 पोति पाठीवर टाकले. गाढवास चालने मुष्किल होऊ लागले. मालकाने जोरात चाबकाचे फटकारे मारण्यास सूरवात केली. गाढव ओरडू लागले. मालकाने ञास सहन करण्याचे आवाहन केले. गाढव रडत होते पण ञास सहन करत होते.
परत पाठीवर 25 पोती टाकली गाढव खालीच बसले, मालकाने जोरात फटकारे मारण्यास सूरवात केली, गाढव पाणी मागू लागले तर फटकारे देण्यात आले. गाढव घायकुतीला आले होते, पाणी पाणी करत होते त्यावेळी अगदी थोडे पाणी दिले. व सांगितले फक्त 50 दिवस ञास सहन कर. गाढव आनंदाने हो म्हणाले. 

परत कामास सूरवात अता 30 पोती उपाशी पोटी टाकण्याचे काम करु लागले. असय्य वेदनेने ओरडत पण भविष्यातील अच्छे दिनासाठी सर्व सहन करत होते.

50 दिवस झाले. मालकाने त्याच्या पाठीवरील ओझे कमी केले. फक्त 10च पोती पाठीवर ठेवले. गाढवास खूप बरे वाटले कारण तीस पोत्यावरुन ओझे 10 पोत्यावर आले. त्याला वाटू लागले हि अच्छे दिनची सुरूवात आहे. मालकाने अगोदर पेक्षा जास्त खायला प्यायला दिले. पोटभर जेवणामूळे गाढव उत्साहीत झाले, पाठीवरील वीस पोत्यांचे ओझे कमी झाल्यामुळे खूष होते. 
मालक परत आवतरले व विचारले ञास कमी झाला का? गाढव आनंदाने हो म्हणाले. मालकाने त्यास सांगितले मी अजून एक योजना पुढील 15 दिवसात आणत आहे त्या योजने नुसार तूला पोटभर दोन वेळेस जेवण, पाणी व पाठीवरी ओझे दोन पोत्याने कमी होईल. म्हणजे फक्त 8च पोती न्यावी लागतील, ञास तर कमी झालाच आहे, खूष आहेस? गाढव आनंदाने हो म्हणाले व पुढील 15 व्या दिवसाची वाट पाहु लागले. कारण त्याचे अच्छे दिन येत होते, ञास कमी होत होता, पहिल्या दिवसा पेक्षा जास्त जेवण मिळत असल्याने गाढव खूष होते. 

परंतु गाढव अगोदरच्या मालका कडे पाचच पोती उचलायचे हे विसरुनच गेले होते
😝🤓

याला म्हणतात “अच्छे दिन”

सारांश: शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण ? एक पुस्तक

image

शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणी निर्माण केला? “

१८६९ साली राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला.
शिवरायांचे जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
तेंव्हा पासून शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात सुरु झाली. याप्रसंगी भटमान्य टिळक १२-१३ वर्षाचा ‘बाळ’ होता. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.

शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्या पेशवाईचे समर्थन व ब्राह्मणांचे जेष्ठपुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात शिवजयंतीबाबद संभ्रम निर्माण करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण आहेत.

पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद’ कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल.ख-या शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त निर्माण होतील, हे रोखण्यासाठी ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली 1)वा.सी.बेंद्रे, 2)न.र.फाटक 3)ग.ह.खरे, 4)द.वा. पोतदार, 5)डॉ.आप्पासाहेब पवार, 6)ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली.

वादग्रस्तबाबींसाठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग इ.त्याप्रमाणेशिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली.

ज्याकामाला २ वर्ष लागतात तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता.
यासमितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.१९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथि प्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहीराती दिल्या.
या पाठीमागे जयंत साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिकाहोती.
जयंत साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी
1)पुरंदरे,
2)बेडेकर,
3)मेहंदळे
यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्र दिली.
शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून जयंत साळगांवकर इतर ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी टिळक प्रेमी आहेत हे सिद्ध होते.
1)जयंत साळगांवकर,
2)पुरंदरे,
3)बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रहधरला.

शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणेणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेला नसून पुरुरंदरे, बेडेेकर आणि जंयत साळगांवकर यांनी निर्माण केलेला.

पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले.
अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.
यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले.
ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला.

या मागील षडयंत्र काय?

तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात.
तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो.
सरकारी बँका, कार्यालये,शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात.
त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना आहे.
म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजनसमाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा डाव आहे.

इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात.
इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात.

जयंत साळगांवकर कॅलेंडर जानेवारी ऐवजी चैत्र (एप्रिल) महिन्यात का बाजारात आणीत नाहीत?
कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे व तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात.

ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभारचालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. तिथी प्रमाणे वादकायम राहतो. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा प्राथमिक शाळा देखील चालत नाही.

शिवाजीराजे तर विषेशवंद्य असे युगपुरुष आहेत. तिथीत अडकविण्याइतके राजे लहान नाहीत. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकरांन यांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला.

तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. भटजीची रोजगार हमी चालावी आणि वादातच शिवराय व शिवभक्त संपावेत यासाठी भटजी तिथीचा आग्रह धरतात.तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला.
शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी एका महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर, बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का? तो समाज जागा असल्यामुळे ब्राह्मण हे धाडस करत नाहीत.
ब्राह्मणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रहधरावा, काय होते ते पाहा.मित्रहो, एका ठिकाणी शिवचरित्राव व्याख्यानासाठी गेलो असताना तारीख-तिथीच्या वादावरुनदोन पक्षांच्या कार्यकर्त्यांत प्रचंड वादावादी चालू होती हा प्रसंग पाहून खूप वाईट वाटले.

शिवचरित्रावरविचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते. यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा आहे.पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्तांना शिवजयंतीच्या तारीख तिथीच्या वादाचे मुळ जेव्हा समजले तेंव्हा सर्व मतभेद विसरुन सर्वांनी १९ फेब्रुवारीला शिवजयंती जोरदार साजरी केली.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण ? या पुस्तकातून)